Manmohan Singh Speech Video : प्रख्यात अर्थतज्ज्ञ व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं २६ डिसेंबर रोजी निधन झालं. मनमोहन सिंह हे तब्बल ३३ वर्षे संसदेचे सदस्य होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या आणि भारताला जगाची कवाडे खुली करून देणाऱ्या मितभाषी मनमोहन यांना जगभरातून आदरांजली वाहिली जात आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. राजकारणात राहूनही शांत, संयमी असलेल्या व कधीही आक्रस्ताळेपणा न करणाऱ्या मनमोहन सिंग यांनी सभागृहात अनेकदा शेरोशायरी करून सर्वांची मनं जिंकली होती. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना सभागृहातून निरोप देताना त्यांनी केलेलं भाषण असंच गाजलं होतं.