मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : उद्धव ठाकरेंनी केजरीवालांना काय वचन दिलं?; ऐका!

Video : उद्धव ठाकरेंनी केजरीवालांना काय वचन दिलं?; ऐका!

May 24, 2023 05:04 PM IST

Arvind Kejriwal at Matoshree Video : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मुंबईत 'मातोश्री' निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार संजय राऊत, खासदार संजय सिंह, अनिल देसाई यावेळी उपस्थित होते. दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. हे सरकार सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय अध्यादेशाच्या माध्यमातून निष्प्रभ ठरवले जात आहेत. इतके स्वार्थी आणि अहंकारी लोक देश वाचवू शकत नाहीत, अशी बोचरी टीका केजरीवाल यांनी यावेळी केली. गेल्या महिनाभरात केजरीवाल यांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp