Suryakanta Patil joins BJP : माजी केंद्रीय मंत्री व हिंगोली-नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मी भाजपमध्ये होते, पण माझा जीव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता. तिथं मी काहीही केलं नाही. मी स्वत: स्वत:वर कारावास लादला होता, तो स्वत:च संपवून टाकला आहे, असं पाटील यावेळी म्हणाल्या. सूर्यकांता पाटील ह्या यापूर्वी पवारांच्याच पक्षात होत्या. मात्र, २०१४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दहा वर्षे भाजपमध्ये राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा त्या पक्षात परतल्या आहेत.