मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : भाजपनं अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा मागताच संजय सिंह काय म्हणाले? ऐकाच!

Video : भाजपनं अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा मागताच संजय सिंह काय म्हणाले? ऐकाच!

Apr 10, 2024 05:23 PM IST Ganesh Pandurang Kadam
Apr 10, 2024 05:23 PM IST

Sanjay Singh Slams BJP : अरविंद केजरीवाल यांची अटक योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटल्यानंतर भाजपनं केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नैतिकतेच्या आधारावर केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा, असं भाजपचं म्हणणं आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपच्या या मागणीचा जोरदार समाचार घेतला आहे. मुंबईपासून मणिपूरपर्यंत भाजपमधील घोटाळेबाज नेत्यांची आणि भाजपच्या कारभाराची यादीच त्यांनी वाचून दाखवली आहे. बंगारू लक्ष्मण यांची पार्टी आम्हाला नैतिकता शिकवणार का? देशभरातील घोटाळेबाजांना वेचून-वेचून पक्षात घेणारा भाजप आम्हाला नैतिकता शिकवणार का,' असा रोखठोक सवाल संजय सिंह यांनी केला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp