sanjay raut reaction on kangana ranaut slapped : चंदीगड विमानतळावर कंगना राणावत हिला झालेल्या मारहाणीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कंगना राणावत या खासदार आहेत. एका खासदाराला मारहाण होणं योग्य नाही.नेमकं काय झालं मला माहीत नाही. पण शेतकरी आंदोलनात बसलेल्यांचा अपमान केल्यामुळं कंगनाला मारहाण झाल्याचं समजतं. कंगनाला मारणाऱ्या महिला जवानाची आई आंदोलनात होती. आईचा अपमान झाला तर कोणालाही राग येणारच, असंही संजय राऊत म्हणाले.