Narendra Modi Ayodhya Speech Video : अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना केल्यानंतर या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या रामभक्तांपुढं आपलं मनोगत व्यक्त केलं. अयोध्येतील हे केवळं मंदिर नसून रामाच्या रुपातील राष्ट्रचेतनेचं मंदिर आहे. राम ही भारताची श्रद्धा आहे. राम हा भारताचा पाया आहे. राम हा भारताचा विचार आहे. राम हा भारताचा कायदा आहे. राम भारताची प्रतिष्ठा आहे. राम भारताचं चिंतन आहे. प्रताप आहे, प्रभाव आहे. राम नित्यता आणि निरंतरतान आहे. राम व्यापक आहे, विश्व आहे, विश्वात्मा आहे. रामाची प्राणप्रतिष्ठा जेव्हा होते, तेव्हा त्याचा प्रभावर काही काळापुरता नसतो. हा प्रभाव हजारो वर्षांसाठी असतो, असं ठाम प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केलं.