बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी शेतकऱ्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवरही भाष्य केलं. निवडणुका अनेक झाल्या. पण यावेळची निवडणूक वेगळी होती. खासकरून बारामतीमध्ये दिल्लीपासून ताकद लावण्यात आली होती. देशाचे पंतप्रधान रोज माझं नाव घ्यायचे. जिथं जाईन तिथं लोक विचारायचे, बारामतीचं काय होईल? पण माझं मन सांगत होतं, बारामतीकर माझी साथ सोडणार नाहीत,' असं शरद पवार म्हणाले.