Jui Gadkari Ear Surgery: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर तिचा हॉस्पिटलमधील सलाईन लावलेला फोटो शेअर केला होता. तेव्हापासून तिचे सगळे चाहते खूप काळजीत पडले होते. जुईला नेमकं काय झालं आहे? याबाबत तिचे चाहते सोशल मीडियाद्वारे चिंता व्यक्त करत होते. मात्र, तिला नेमकं काय झालं, याची कल्पना कुणालाच नव्हती. जुईने एक फोटो शेअर करत ‘लवकरच काय झालं आहे ते शेअर करेन’ असं म्हटलं होतं आणि अखेर तिने तिच्या आजारपणाचं कारण सांगितलं आहे.