jaya bachchan slams Modi govt : संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: संसदेत निवदेन करावं अशी मागणी विरोधकांनी दोन्ही सभागृहात लावून धरली आहे. त्यावरून लोकसभा अध्यक्ष व राज्यसभा सभापतींनी तब्बल १४१ खासदारांना अधिवेशनातून निलंबित केलं आहे. खासदार जया बच्चन यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयुष्यात कधीही नियम न मोडणाऱ्या खासदारांनाही निलंबित करण्यात आलं आहे. विरोधकच नसतील तर कसली आलीय लोकशाही? यांची नेमकी काय खिचडी शिजत असते कळत नाही, असं जया बच्चन म्हणाल्या.