Rahul Gandhi Video : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ही लढाई फक्त राजकीय नव्हती. संविधान वाचवण्याची लढाई होती. देशाची जनता संविधान वाचवण्यासाठी लढेल हा विश्वास मला होता आणि लोकांनी ते केलं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी हा देश चालवावा हे लोकांना पसंत नाही. त्यांनी आपली नापसंती दर्शवली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.