ajit pawar video : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा नुकताच मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झाला. यावेळी अजित पवार यांनी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचंही त्यांनी विश्लेषण केलं. विरोधकांनी रेटून काही चुकीच्या गोष्टींचा प्रचार केला. आपल्याला कमी जागा मिळाल्या असल्या तरी महाविकास आघाडी व महायुती याच्यातील मतामध्ये फक्त अर्ध्या टक्क्याचा फरक आहे. त्यात हा सगळा चमत्कार झाला, असं अजित पवार म्हणाले. या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.