Women in Saree played football in Gwalior : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथं महिलांनी चक्क साडी नेसून फुटबॉल खेळला. साडीमुळं त्यांच्या खेळात कुठलाही अडथळा आला नाही. अत्यंत चपळाईनं आणि सहजपणे महिला फुटबॉलच्या मागे धावत होत्या. गोल पोस्टच्या दिशेनं फुटबॉलला किक मारत होत्या. २० ते २५ वयोगटातील तरुणी व महिला यात सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेला 'गोल इन सारी' असं नाव देण्यात आलं होतं. खेळाची आवड आणि उर्मी असली की काहीही अशक्य नाही, हेच या महिलांनी दाखवून दिलं.