sharad pawar latest video : मराठा व ओबीसी समाजामध्ये सुरू असलेल्या आरक्षण वादावर बोलताना सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप केले होते. बारामतीवरून फोन आल्यामुळं सर्वपक्षीय बैठकीला विरोधक गेले नाहीत असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता. भुजबळ यांच्या या आरोपांना शरद पवार यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघातील वार्तालप कार्यक्रमात उत्तर दिलं. मराठा आरक्षणासाठी व ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी भांडणाऱ्या दोन्ही बाजूच्या नेत्यांना सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत आश्वासनं दिली आहेत. त्यांच्याशी सत्ताधाऱ्यांनी संवाद साधला आहे. आता शांतता निर्माण व्हावी म्हणून सरकार विरोधकांना बोलवत आहे. राज्याच्या हितासाठी पुढाकार घ्यायला आम्ही तयार आहोत. मात्र, सरकारनं आतापर्यंत दोन्ही समाजाला काय आश्वासनं दिली किंवा पूर्ण केली याची वस्तुस्थिती विरोधकांना कळायला हवी. तर त्यातून पुढं मार्ग काढता येईल, असं शरद पवार म्हणाले.s