Sushma Andhare : नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा चिरंजीव संकेत बावनकुळे यानं काही वाहनांना उडवल्यामुळं राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी निष्पक्ष कारवाई होईल, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गाडीत संकेत बावनकुळेच होता तर त्याचं नाव एफआयआरमध्ये का नाही? संबंधित गाडीची कागदपत्रे पोलीस ठाण्यात का जमा केली गेली नाहीत? अर्जुन, संकेत व रोनित यांच्यावर कारवाई का नाही? संकेत बावनकुळे याच्या विरोधात नेमकी कोणती तक्रार दाखल केली जाणार आहे? या प्रकरणात पोलिसांवर काहीच दबाव नाही का? या सगळ्यांची उत्तरं निष्पक्ष कारवाईबद्दल बोलणाऱ्या बावनकुळे यांनी द्यावीत, असं अंधारे यांनी ठणकावलं आहे.