Chhagan Bhujbal on NCP Image : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी किंवा इतर लहान समाजातील नेत्याची नियुक्ती केली जावी, अशी मागणी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आपल्या या मागणीचा उद्देश काय आहे हे त्यांनी आज सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस हा एकाच समाजाचा पक्ष आहे अशी टीका केली जाते. ही प्रतिमा बदलण्याची गरज आहे. तसं झालं तर पक्षाला फायदा होईल, असं भुजबळ म्हणाले. नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.