Rahul Gandhi questions Narendra Modi : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडंच शिवछत्रपतींची माफी मागितली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगलीतील कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांना यावरून घेरलं. मोदींनी शिवछत्रपतींची माफी नेमकी का मागितली? त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. हा पुतळा बनवण्याचं कंत्राट RSS मधील कोणाला तरी दिला गेलं असावं. ते मेरिटवर द्यायला हवं होतं असं मोदींना म्हणायचं असेल. पुतळा बनवताना भ्रष्टाचार झाल्याबद्दल त्यांनी माफी मागितली असेल. पुतळा नीट उभारला गेला नाही याबद्दल त्यांना खंत वाटली असेल, असं राहुल गांधी म्हणाले. 'नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यांनी फक्त शिवाजी महाराजांचीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.