Uddhav Thackeray Speech Video : नागपूरमधील कळमेश्वर इथं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'मी मुख्यमंत्री असताना इथला कोणताही प्रकल्प गुजरातला गेल्याची एकही बातमी ऐकली होती का? गेल्या अडीच वर्षांत हे मिंधे (शिंदे) मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले आहेत. सर्व काही गुजरातला नेले जात आहे. मुंबईचे आर्थिक केंद्रही गुजरातला नेण्यात आले आहे. आम्ही केवळ सत्तेसाठी लढत नाही, तर आमची लढाई महाराष्ट्राच्या लुटीच्या विरोधात आहे. महाराष्ट्राच्या लुटीच्या आड आम्ही येतोय म्हणून ह्यांना शिवसेना संपवायची आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.