Raj Thackeray on ED Notice : मनसेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज मुंबईत पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन करताना ईडीच्या चौकशीच्या संदर्भात आपली बाजू मांडली. कोहिनूर मिलच्या प्रकरणात आपल्याला ईडीनं नोटीस का पाठवली? त्यानंतर नेमकं काय झालं हे राज ठाकरे यांनी भाषणातून सांगितलं. नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याचा आणि ईडीच्या नोटिशीचा काहीएक संबंध नाही, असंही ते म्हणाले.