BJP Legislative Party Meeting : विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपनं आज मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकात पाटील यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर सर्व ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला.