Jitendra Awhad on Beed Crime : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी आणि सूत्रधारांना अटक करावी, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत ३२ खून झाले आहेत. प्रत्येक खुनामागे वाल्मिक कराड हाच आरोपी आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच आहे. तो बीडचा छोटा शकील आहे. त्यांच्या बॉसनं आदेश द्यायचा आणि ह्यानं गुन्हे करायचे असं सुरू आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. आरोपींवर कारवाई झाली नाही तर बीडमध्ये सोमवारी मोर्चा काढून आंदोलन करणार, असा इशारा संदीप क्षीरसागर यांनी दिला आहे.