मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : राक्षसही करणार नाही असं कृत्य मिहिर शहा यानं केलंय; आदित्य ठाकरे संतापले!

video : राक्षसही करणार नाही असं कृत्य मिहिर शहा यानं केलंय; आदित्य ठाकरे संतापले!

Jul 10, 2024 07:45 PM IST

Aaditya Thackeray on BMW hit & Run case : मुंबईतील वरळी येथील हिट अँड रन प्रकरणात बळी गेलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांची आदित्य ठाकरे यांनी आज भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राक्षसही करणार नाही असं कृत्य मिहिर राजेश शहा यानं केलंय. हेच कृत्य एखाद्या सामान्य माणसाकडून झालं असतं तर सरकारनं तत्परतेनं कारवाई केली असती. पण मिहिर शहा याला ६० तास लपायला दिलं. त्याच्या गाडीचा नंबर बदलण्यात आला. गाडीवरचा पक्षाचं चिन्ह काढण्यात आलं. हे सगळं कोणी केलं?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. आता बार वगैरेवर कारवाई होईल, पण मिहिर शहाच्या घरावर बुलडोझर चालणार आहे का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. नाखवा कुटुंबाला कोणतीही मदत नको आहे. मिहिर शहाला शिक्षा झाली पाहिजे इतकंच नाखवा कुटुंबीयांचं आणि वरळीच्या जनतेचं म्हणणं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp