Sharad Pawar : अमित शहा यांनी केलेल्या दगाबाजीच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. 'अमित शहा हे तडीपार असताना जेव्हा गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे जास्त सांगतील. आज तेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. पातळी किती घसरली हे सांगायला त्यांची ही विधानं पुरेशी आहेत. त्यांच्या वक्तव्याची त्यांच्या पक्षात किती नोंद घेतली जाते माहीत नाही, असंही शरद पवार म्हणाले.