बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी सोमवारी, २८ ऑक्टोबर रोजी अर्ज भरला. पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार हे यावेळी स्वत: उपस्थित होते. युगेंद्र पवार यांनी यावेळी आपली भूमिका मांडली. माझ्या समोर कितीही मोठे उमेदवार असले तरी माझ्या पाठीशी शरद पवार साहेब आहेत. मी आता कुठलाही भावनिक विचार करत नाही. पवार साहेबांना मला साथ द्यायची आहे एवढंच मला माहीत आहे. बारामतीच्या जनतेनं निवडून दिल्यानंतर पवार साहेबांनी सांगितल्यानुसार मी काम करेन, असंही त्यांनी सांगितलं.