Vikas Divyakirti video : दिल्लीच्या जुन्या राजिंदर नगर कोचिंग सेंटरमध्ये तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीतील सर्व कोचिंग क्लासेसच्या बेसमेंटला टाळं ठोकण्यात आलं आहे. त्यात विकास दिव्यकीर्ती यांची दृष्टी IAS ही संस्थाही आहे. त्यावर त्यांनी आतापर्यंत प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यावरूनही चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी मौन सोडलं आहे. कारवाई अनेक कोचिंग क्लासेसच्या बेसमेंटवर झाली आहे. मात्र, लक्ष्य मला केलं जात आहे. त्यात प्रत्येकाचा आपला हेतू आहे. प्रत्येकाला अशा प्रकरणांमध्ये बळीचा बकरा हवा असतो, असंही दिव्यकीर्ती म्हणाले. लोकांना माझ्याकडून इतकी अपेक्षा आहे याचं मला समाधान आहे, असंही त्यांनी सांगितलं.