vasant more video : मनसेला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविणारे पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मोरे यांचं पक्षात स्वागत केलं. वसंत मोरे यावेळी बोलताना भावूक झाले. मूळचे शिवसैनिक असलेल्या मोरे यांनी आपल्या राजकीय वाटचालीचा यावेळी थोडक्यात आढावा घेतला. पुण्यात पुन्हा एकदा शिवसेनेची मोठी ताकद उभी करू आणि २५ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू, असा निर्धार वसंत मोरे यांनी यावेळी बोलून दाखवला.