Uddhav Thackeray Latest Speech : शिवसेना (उबाठा) प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचं राज्यस्तरीय अधिवेशन नुकतंच पार पडलं. अधिवेशनात शिक्षकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या गैर शैक्षणिक कामांबद्दल उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षक नियुक्तीमधील कंत्राटी पद्धतीवरही त्यांनी टीका केली. बौद्धिकदृष्ट्या ठेंगू माणसांच्या सावल्या लांब पडायला लागल्या की सूर्यास्त जवळ आला आहे असं समजावं. आज देश सूर्यास्ताकडं जातोय की काय असं वाटतं, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील राजवटीला हाणला.