Uddhav Thackeray Video : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सभागृहातून निलंबित करण्यात आल्यामुळं शिवसेनेचे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतापले आहेत. लोकशाही सभागृहाला किंवा सभागृहाच्या अध्यक्षाला सदस्यांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्या सदस्याची बाजू ऐकून घेतली जाणं गरजेचं आहे. अंबादास दानवे यांची बाजू ऐकून घेतली गेली नाही. आधीच ठरल्याप्रणाणे, कोणीतरी मागणी केली म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच घडलं नसेल, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.