Uddhav Thackeray Video : बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं शनिवार, २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. 'या घटनेची केवळ निंदा करून भागणार नाही. या घटनेमुळं जनतेच्या मनात प्रचंड खदखद आहे. जनतेच्या मनात एक उद्वेग आहे. या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीनं २४ ऑगस्टला बंद पुकारला आहे. राज्यातील सर्व जनतेनं उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी व्हावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.