Uddhav Thackeray Video : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलं आहे. मुंबईत पदवीधर मतदारसंघात ठाकरे शिवसेनेच्या अनिल परब यांचा विजय झाला, तर शिक्षक मतदारसंघात ज. मो. अभ्यंकर यांनी बाजी मारली. या निकालावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांचे आभार मानले. नाशिक शिक्षक मतदारसंघात संदीप गुळवे यांनी महायुतीच्या उमेदवाराला जोरदार टक्कर दिली. मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. तर, कोकण पदवीधरमध्ये महाविकास आघाडीच्या रमेश कीर यांना पराभव पत्करावा लागला. या मतदारसंघातही महाविकास आघाडीला मतदान करणाऱ्यांचे उद्धव यांनी आभार मानले.