Uddhav Thackeray Video : मनसेला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविणारे पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मोरे यांचं पक्षात स्वागत केलं. मूळचे शिवसैनिक असूनही मधल्या काळात शिवसेना सोडल्याबद्दल ठाकरे यांनी वसंत मोरे यांना यावेळी शिक्षा सुनावली. शिवसेना यापूर्वी पुण्यात जितकी मजबूत होती, त्यापेक्षा अधिक मजबूत करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्यावर सोपवली आहे.