Uddhav Thackeray Speech : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज पार पडला. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर भाष्य केलं. शिवसेना-भाजप युती असताना ज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री असं आमचं धोरण होतं. पण ते आमच्या अंगाशी आलं. आमच्या जागा पाडण्याचे उद्योग समोरच्यानं केले. आता त्याची पुनरावृत्ती नको. आपला चेहरा ठरवा आणि पुढं चला. मग तो काँग्रेसचा असो किंवा राष्ट्रवादीचा, माझा त्याला जाहीर पाठिंबा असेल, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.