मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : महिलांसाठी काम करायचंय ना, मग बिल्किस बानोला भेटा; उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Video : महिलांसाठी काम करायचंय ना, मग बिल्किस बानोला भेटा; उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Feb 01, 2024 03:28 PM IST Ganesh Pandurang Kadam
Feb 01, 2024 03:28 PM IST

Uddhav Thackeray Latest Speech Video : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज खोचक शब्दांत टीका केली. पेणमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला या चार जातींसाठी सरकार काम करणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी टोला हाणला. देशात गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण आहे हे आता कळलं का? सुटाबुटातल्या मित्रांच्या आणि अदानीच्या पलीकडंही हा देश आहे हे तुम्हाला कळलं हे काही कमी नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महिलांकडं लक्ष देणार आहात तर मणिपूरमध्ये जा. त्यांनाही कळू द्या की निवडणूक आल्यावर तुम्ही त्यांच्यासाठी काम करणार आहात? बिल्किस बानोकडंही जा, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp