Suresh Dhas Speech in Vidhan Sabha : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नुकतीच अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्याकांडानं महाराष्ट्र हादरला आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. बीडचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाचा थरारक घटनाक्रम सांगितला. तो घटनाक्रम ऐकून सभागृह देखील अवाक् झालं.