Supriya Sule of Majhi Ladki Bahin Yojana : राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महायुती सरकारनं घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १,५०० रुपये मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज यावर भाष्य केलं. सरकार महिलांसाठी एखादी चांगली योजना आणत असेल तर स्वागतच आहे. मात्र, दीड हजार रुपयांमध्ये किती गोष्टी येतात? आज डाळीचे, पिठाचे भाव काय आहेत? दीड हजारांतून महिलांना किती दिलासा मिळणार हा प्रश्नच आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.