Supriya Sule on Walmik Karad : संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेला व सध्या खंडणीप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला वाल्मिक कराड याच्यावर ईडीनं कारवाई का केली नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पीएमएलए कायद्यात खंडणी विरोधी कारवाईची देखील तरतूद आहे. वाल्मिक कराड हे गुन्हे दाखल आहेत. शिवाय यापूर्वीच त्याला ईडीची नोटीस आली आहे. असं असताना त्याच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला.