Smriti Irani Speech in Lok Sabha : मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चर्चेत भाग घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. मणिपूरमध्ये भारतमातेचा खून पाडला गेलाय. भाजपसाठी मणिपूर हा भारताचा भागच नसल्यासारखं वाटतं, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या भाषणानंतर बोलायला उभ्या राहिलेल्या महिला व बाल विकासमंत्री स्मृती ईराणी यांनी राहुल यांच्यावर वैयक्तिक टीका केली. राहुल यांनी एका महिला खासदाराकडं पाहून फ्लाइंग किस दिल्याचाही आरोप केला. त्यामुळं खळबळ उडाली आहे.