Shivraj Singh Chauhan : मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे. मध्य प्रदेशातील जनतेच्या मनात मोदी आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उत्तम नियोजनाला यश आलं आहे. कुठलंही यश एका रात्रीत मिळत नाही. सातत्यानं चांगलं काम केल्याचा हा परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.