Anil Parab in Vidhan Parishad : कल्याणमध्ये एका उत्तर भारतीयाकडून मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेबरोबरच विधान परिषदेतही गाजला. अखिलेश शुक्ला नामक व्यक्तीनं बाहेरचे गुंड आणून मराठी व्यक्तीला मारहाण केली. या शुक्लाला सरकारी नोकरीतून तात्काळ बडतर्फ करा, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केली. असेच दोन प्रकार मुलुंड आणि गिरगाव इथंही घडलेत. मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीयीकरण चालू आहे का? ही दादागिरी कशाच्या जोरावर केली जाते? हा सत्तेचा माज आहे, असा सवाल परब यांनी केला.