Sharad Pawar on Rane Family : रत्नागिरीतील चिपळूण येथील जाहीर सभेत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज नारायण राणे यांच्या मुलांवर जोरदार टीका केली. ‘महाराष्ट्राच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याची पुढची पिढी अशा प्रकारची झालेली मी पाहिलेली नाही,’ अशी जळजळीत टीका शरद पवार यांनी केली. 'नारायण राणे यांचे धाकटे चिरंजीव आमदार नीतेश राणे हे सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आवाज उठवत असतात. अनेक जाहीर सभांमध्ये ते थेट मुस्लिमांबद्दल बोलतात. त्यामुळं सामाजिक तणाव निर्माण होण्याची भीती आहे. याच अनुषंगानं शरद पवार यांनी जाहीर सभेत भाष्य केलं.