Sharad pawar on Karnataka resutls Video : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला असून काँग्रेसनं निर्विवाद बहुमत मिळवलं आहे. त्यावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे. सत्तेचा गैरवापर हा भाजपला नडल्याचं पवारांनी म्हटलं आहे. फोडाफोडी, धर्म आणि जातीचं राजकारण लोकांना पसंत पडत नाही, हेच या निवडणुकीतून दिसलं आहे.