Sharad Pawar on Ram Mandir Invitation : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण आल्यास अयोध्येला जाणार का, या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी आज दिलं. 'आतापर्यंत मला आमंत्रण आलेलं नाही. येईल असं वर्तमानपत्रातून समजतं आहे. पण २२ जानेवारीला तिथं गर्दी असेल. अशा परिस्थितीत मी जाणार नाही. निवडणूक झाल्यानंतर लोकांना तिथं पाठवण्याचा एका पक्षाचा कार्यक्रम आहे. तो झाल्यावर कधीही मी शांततेत जाईन. त्यासाठी आमंत्रणाची गरज नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं.