Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाकडं देशाचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी अजितदादांना आव्हान दिलं आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांनी आज कान्हेरी गावातील हनुमान मंदिरात सभा घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या घर फोडल्याच्या आरोपाला उत्तर दिलं. घर फोडण्याचं पाप माझ्या हातून कधी होणार नाही. माझ्या आई-वडिलांनी आणि भावांनी मला ते कधी शिकवलं नाही,' असं शरद पवार म्हणाले.