Sharad Pawar Lonavala Speech Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी आज पुणे जिल्ह्यातील लोणावळा इथं पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं. या मेळाव्याला येणाऱ्या काही कार्यकर्त्यांना अजित पवार गटाच्या आमदारांकडून व पदाधिकाऱ्यांकडून दमदाटी करण्यात आल्याची तक्रार त्यांच्याकडं करण्यात आली होती. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. 'ज्यांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी घाम गाळला, त्यांनाच तुम्ही दमदाटी करता? पहिली वेळ आहे म्हणून मी सोडून देतो, पुन्हा असं झालं तर शरद पवार म्हणतात मला हे लक्षात ठेवा, असा दम पवारांनी भरला. 'मी अशा रस्त्यानं कधी जात नाही, पण तशी परिस्थिती कुणी निर्माण केली तर सोडतही नाही,' असं त्यांनी ठणकावलं.