Sanjay Raut on Delhi Press Conference : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात मोठी गडबड झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. संसदेतही हा आरोप करण्यात आला. त्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. निवडणूक आयोगाला गुलाम बनवून निवडणुका जिंकायचा नवा पॅटर्न आला आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल आणि निवडणूक आयोग जिवंत असेल तर त्यांनी मतदारांची यादी आम्हाला द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.