Sanjay Raut Video : दरवर्षी २५ जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळण्याच्या केंद्रातील एनडीए सरकारच्या निर्णयावर संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे. आणीबाणी ही त्या वेळेची गरज होती. इंदिरा गांधी यांच्या जागी त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी असते तर त्यांनीही आणीबाणी लावली असती, असा ठाम दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अमित शहा यांना आणीबाणी काय होती हे माहीत नाही. तेव्हा ते किती वर्षाचे होते माहीत नाही. अमित शहा आज नकली शिवसेनेसोबत ज्या बाळासाहेब ठाकरे यांचं गुणगान गातात, त्याच बाळासाहेबांनी आणीबाणीला जाहीर पाठिंबा दिला होता. आरएसएसनंही जाहीर पाठिंबा दिला होता, असा दावाही संजय राऊत यांनी केला.