आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद झाली. आघाडीत प्रत्येकी ८५ जागांचं वाटप पूर्ण झालं आहे आणि २७० जागांवर सहमती झाली आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. शिवसेनेनं जाहीर केलेल्या उमेदवार यादीत काही दुरुस्त्या आहेत. त्यात प्रशासकीय चूक कशी झाली त्यावर आम्ही उद्या बसून चर्चा करणार आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळं शिवसेनेच्या (उबाठा) यादीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.