मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : शरद पवारांचे विश्वासू आमदार राजेश टोपे यांच्या तोंडी शिवसैनिकाची भाषा, म्हणाले…

video : शरद पवारांचे विश्वासू आमदार राजेश टोपे यांच्या तोंडी शिवसैनिकाची भाषा, म्हणाले…

Jul 11, 2024 06:20 PM IST

Rajesh Tope Video : माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी पक्षात त्यांचं स्वागत केलं. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. लोकांना सुडाचं, जातीपातीचं, फोडाफोडीचं, अनैतिकतेचं राजकारण मान्य नाही. महाराष्ट्र पुरोगामी विचारातून काम करणारं राज्य आहे. त्यामुळं लोकांनी जातीयवादी पक्षाला जागा दाखवली आहे, असं टोपे म्हणाले. पवार साहेबांना ज्यांनी सोडलं ते कधीच मोठे होऊ शकले नाहीत. माणसाचा गुरू चांगला असावा, तरच त्याचं जीवन यशस्वी होऊ शकतं. महाभारत आपल्याला माहीत आहे. कृष्णासारखा सारथी होता म्हणून पांडवांना विजय मिळाला, असं टोपे म्हणाले. पवार साहेबांनीही विचारांशी तडजोड केलेली नाही. आता त्यांना साथ देण्याची गरज आहे, असं आवाहन टोपे यांनी केलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp