video : मनसे लोकसभेची निवडणूक लढणार नाही; काय म्हणाले राज ठाकरे?
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : मनसे लोकसभेची निवडणूक लढणार नाही; काय म्हणाले राज ठाकरे?

video : मनसे लोकसभेची निवडणूक लढणार नाही; काय म्हणाले राज ठाकरे?

Published Apr 10, 2024 12:09 PM IST

Raj Thackeray Gudi Padwa Rally Speech : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी छोटेखानी भाषण केलं. भाजप आणि मनसे युती होणार का या चर्चेलाही त्यांनी उत्तर दिलं. थेट निवडणूक न लढता राज ठाकरे यांनी भाजपप्रणित शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महायुतीला पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी देत आहोत, असंही राज ठाकरे म्हणाले. कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या कामाला लागावं, असं आवाहनही त्यांनी जाता-जाता केलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp