Rahul Gandhi Kurukshetra Speech Video : हरयाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्वच ज्येष्ठ नेते प्रचारात उतरले आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी हे देखील जोमानं प्रचार करत आहेत. कुरुक्षेत्र इथं झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपरोधिक शब्दांत हल्ला चढवला. नरेंद्र मोदी हे डायरेक्ट देवानं पाठवलेले आहेत. ते आपल्यासारखे बायोलॉजिकल नाहीत. देव त्यांच्याकडून काम करून घेतो. ते खरंच आहे, पण मोदींचा देव अदानी आहे, अशी जहरी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.