Rahul Gandhi on Hindu in Lok sabha : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. आमच्या सर्व महापुरुषांनी अहिंसा आणि भय संपविण्याबद्दल सांगितलं आहे, पण, जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते फक्त हिंसा, द्वेष, असत्य यावर बोलतात. ते हिंदूच नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या विधानावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील यावेळी सभागृहात होते.